ट्युनिशियाची राजधानी ट्युनिस शहरात मंगळवारी रात्री राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणा-या बसमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात १२ सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
ट्युनिशियाचे अध्यक्ष बेजी केड इसेबसी यांचे सुरक्षा रक्षकांची बस स्थानकावर थांबली असता स्फोट झाला. स्फोटावेळी रस्त्यावर मुसळधार पावसामुळे वाहतूक कमी होती. बसमध्ये दहशतवाद्यांनी आगोदरच बॉम्ब ठेवल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रपतींनी आपला स्वित्झर्लंडचा दौरा रद्द केला असून ट्युनिशियात महिनाभरासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर, ट्युनिस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.