News Flash

येमेनमधील स्फोटात तीन पोलीस ठार

साना येथे शनिवारी एका तपासणी नाक्यावर प्लास्टिक बॅगेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये तीन पोलीस ठार झाले, तर एक जण जखमी झाला, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी

| July 7, 2013 03:41 am

साना येथे शनिवारी एका तपासणी नाक्यावर प्लास्टिक बॅगेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये तीन पोलीस ठार झाले, तर एक जण जखमी झाला, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस तपासणी नाक्याजवळच प्लास्टिकच्या पिशवीत बॉम्ब दडवून ठेवण्यात आला होता. तपासणीसाठी पोलिसांनी पिशवी उघडताच रिमोटच्या साहाय्याने त्या बॉम्बचा स्फोट घडविण्यात आला. त्यामध्ये दोन पोलीस जागीच ठार झाले आणि दोन गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. या घटनेनंतर स्थानिक परिसराची नाकेबंदी करून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 3:41 am

Web Title: bomb blast kills 3 police officers in yemen
टॅग : Bomb Blast
Next Stories
1 सीमा करार : लवकर तोडगा काढण्यावर भारत, चीनचा भर
2 इशारा मिळाला होता; मग बॉम्बस्फोट झाले कसे? भाजपचा सवाल
3 पुनश्च ‘हे राम!’
Just Now!
X