बिहारमधील न्यायालयाच्या परिसरात आज मंगळवार दुपारी दोन गावठी बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात एका प्रकरणातील आरोपींना हजर करण्यापूर्वी न्यायालय परिसरात मुद्दाम बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. स्फोटाचा वेध साधून एका आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्नही केला. पण, पोलिसांनी वेळीच आरोपी संत लाल शाह याला ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळावरून एक जीवंत बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचबरोबर एका महिलेने हे सर्व बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार त्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. बॉम्बस्फोटामुळे कोणत्याही प्रकारची जीवतहानी झालेली नाही. 

(संग्रहित छायाचित्र)