25 February 2021

News Flash

काश्मीरमध्ये ट्रकवर बॉम्बहल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये ट्रकवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात पोलिसासह तीन नागरिक जखमी झाले

जम्मू-काश्मीरमध्ये ट्रकवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात पोलिसासह तीन नागरिक जखमी झाले असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही चित्रणामुळे या प्रकरणातील दोन हल्लेखोरांना अटक करण्यात यश मिळाल्याचे उधमपूरचे उपायुक्त शाहिद इक्बाल यांनी सांगितले. या दोन्ही हल्लेखोरांची चौकशी केल्यावर त्यांनी अन्य चार जणांची नावे सांगितली. सर्व सहा हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती इक्बाल यांनी दिली. हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री ट्रकची काच फोडून ट्रकमध्ये पेट्रोल बॉम्ब टाकला. या घटनेत ट्रकमधील तीन व्यक्ती, पोलीस, चालक आणि वाहक असे सहा जण जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 12:11 am

Web Title: bombarding at kashmir
Next Stories
1 सुपर ३० अकादमीस जर्मनीच्या प्रतिनिधींची भेट
2 ‘मोदींच्या नावावर पंचायत निवडणूकही लढवतील’
3 अंकारामध्ये रेल्वे स्टेशनजवळ आत्मघातकी हल्ला; २० जण ठार
Just Now!
X