12 July 2020

News Flash

ब्रिटीश तरुणीच्या हत्येप्रकरणी दहा वर्षांचा तुरुंगवास

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय दिला आहे

गोव्यातील ब्रिटीश तरुणी स्कारलेट हत्या प्रकरणी न्यायालयाने  गुन्हेगार सॅमसन डिसुझा याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने यावेळी दुसरा आरोपी प्लासादो कार्व्हालो याची निर्दोष मुक्तता केली आहे. मुलांसबंधीच्या खटल्यांचं कामकाज पाहणाऱ्या गोवा न्यायालयाने गतवर्षी दोघांची सुटका केली होती. यानंतर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर कोर्टाने या सॅमसन डिसूझा याला दोषी ठरवलं.

काय आहे प्रकरण –
२००८ रोजी गोव्यातील अंजुना बीचवर स्कारलेट मृतावस्थेत आढळली होती. तिच्या शरिरावर अनेक जखमांच्या खुणाही होत्या. सॅमसन डिसुझा आणि प्लासादो कार्व्हालो या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप होता. स्कारलेट ब्रिटीश नागरिक असल्याने आंतरराष्ट्रीय मीडियाने या घटनेची दखल घेतली होती.

गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. मात्र स्कारलेटच्या आईने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने गोवा सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2019 6:11 pm

Web Title: bombay high court goa sentenced 10 years of imprisonment samson dsouza murder of a british teenager scarlett keeling sgy 87
Next Stories
1 राष्ट्रवादी, तृणमूल, CPI वर टांगती तलवार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द होण्याची शक्यता
2 कुमारस्वामी सरकारला सायंकाळी सहा पर्यंतची अंतिम मुदत
3 पाकिस्तानी आणि चीनी लोकांसाठी नरेंद्र मोदी आहेत ‘आदर्श व्यक्तीमत्व’
Just Now!
X