यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत दोनदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या हिलरी मँटेल यांना स्थान मिळाले नसून नवीन लेखकांच्या पदार्पणातील पुस्तकांना स्थान मिळाले आहे. डायना कुक, अवनी दोशी, ब्रँडन टेलर, स्कॉटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान मिळाले आहे. तिस्ती डॅनगरेम्बा, माझा मेंगिस्टी यांचाही त्यात समावेश आहे.

माजी जैवरसायनशास्त्रज्ञ टेलर यांच्या शगी बेन हिच्या समलिंगी जीवनावर आधारित कादंबरीला स्थान मिळाले असून,  ऐशीच्या दशकातील ग्लासगोतील दारिद्रय़ व व्यसनाधीनतेवर आधारित स्टुअर्ट यांच्या पुस्तकासही स्थान मिळाले आहे.

‘दी न्यू विल्डरनेस’ हे कुक यांचे पुस्तक शर्यतीत असून, अवनी दोशी यांचे ‘बन्र्ट शुगर’ हे पुस्तक भारतीय महिला व तिची आई यांचे नाते सांगते. मेंगिस्टी  यांचे ‘दी श्ॉडो किंग’ कादंबरी इथिओपियातील जुन्या पार्श्वभूमीवरची आहे. झिम्बाब्वेचे लेख डँगरेम्बा यांच्या ‘धिस मोर्नेबल बॉडी’ या पुस्तकाने वसाहतवाद व भांडवलवादाचा वेध घेतला आहे. सध्या त्यांना झिम्बाब्वेत हरारे येथे अटकेत ठेवण्यात आले आहे, कारण त्यांनी सरकारी भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने केली होती. तेरा पुस्तकांच्या दीर्घ यादीतून ही लघु यादी तयार करण्यात आली आहे, असे निवड समितीच्या अध्यक्षा मार्गारेट  यांनी सांगितले. सहा जणांची यादी अनपेक्षित असून त्यातील पात्रे ही आपल्या जीवनाशी स्पंदित होणारी आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. बुकर पुरस्कार हा पन्नास हजार पौंडाचा असून तो १७ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. यावर्षीची यादी ही ५१ वर्षांच्या इतिहासात वेगळी व वैविध्यपूर्ण आहे. त्यात सहापैकी चार कादंबऱ्या या पदार्पणातील आहेत. शिवाय ब्रिटिश लेखक किंवा लेखिकेचे एकही पुस्तक त्यात नाही. या यादीतील ब्रँडन टेलर अलाबामातील माजी जैवरसायनशास्त्रज्ञ असून डग्लस स्टुअर्ट हे स्कॉटिश फॅशन डिझायनर आहेत. डायनी कुक या माजी रेडिओ निर्मात्या आहेत तर अवनी दोशी या कला इतिहासकार, तित्सी डँगरेम्बा झिम्बावेचे चित्रपट निर्माते, तर माझा मेंगिस्ती इथिओपियन लेखक आहेत.