भारतासमवेतचे संबंध बळकट व्हावेत, ही इच्छा व्यक्त करतानाच सीमातंटय़ासारख्या प्रलंबित मुद्दय़ावर तोडगा काढण्याची बाब कठीण असून ते काम एखाद्या पर्वतावर चढण्याएवढे कठीण असल्याचे चीनने म्हटले आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी हे मत मांडले आहे. भारत आणि चीनन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य मजबूत व्हावे, यासाठी उभय देशांनी सीमा तंटय़ावर अंतिम तोडगा काढावा, अशीही सूचना यी यांनी केली. भारत आणि चीनसाठी सीमा तंटा हा एखाद्या इतिहासासारखा असून त्यावर अनेक वर्षे काम करून काही प्रमाणात प्रगतीही केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.