News Flash

युकेच्या पंतप्रधानानी स्वीकारलं प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याचं निमंत्रण; मोदींनाही ‘रिटर्न गिफ्ट’

एस. जयशंकर आणि डॉमनिक राब यांच्यात अनेक विषयांवर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिलं होतं. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे निमंत्रण स्वीकारलं असून ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

ब्रिटननं ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. यावर्षी ब्रिटनमध्ये जी ७ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा केली.

बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल. ब्रेक्झिटनंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण त्यांचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रणही दिलं आहे. दरम्यान, ब्रिटनला भारतासोबत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा असल्याची माहिती ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.

एस. जयशंकर आणि डॉमनिक राब यांच्या चर्चेदरम्यान दहशतवाद आणि कट्टरताबादामुळे निर्माण झालेल्य़ा समस्यांवर चर्चा करण्यात आली. “आम्ही अफगाणिस्तानातील परिस्थिती, आखाती देश आणि हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थितीची समीक्षा केली. भारत आणि ब्रिटन करोना महासाथीनंर पुन्हा एकदा आर्थिकरित्या रुळावर येण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक दृढ करतील,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 3:23 pm

Web Title: boris johnson accepts indias invite will be republic day parade chief guest asked pm modi to join g7 jud 87
Next Stories
1 वाईफ स्वॅपिंगसाठी नवरा करत होता जबरदस्ती, अखेर महिलेने उचलले हे पाऊल
2 आम आदमी पार्टी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये उतरणार
3 कर्नाटक विधानपरिषदेत गदारोळ, काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना खुर्चीवरुन खेचलं
Just Now!
X