24 October 2020

News Flash

बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

बुधवारी ते पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची जागा घेतील. ब्रक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, जॉन्सन हे पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशा शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आल्या होत्या.

ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या 1 लाख 60 हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान, जॉन्सन हे आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होतो. दरम्यान, थेरेसा मे सरकारमधील परराष्ट्र मंत्री अॅलन डंकन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच जॉन्सन यांच्यासोबत आपण काम करू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.

यापूर्वी रविवारी अर्थमंत्री फिलिप हॅमंड यांनीही जॉन्सन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. तर डेव्हिड गुईके यांनीही जॉन्सन यांच्या निवडीनंतर अनेक मंत्री राजीनामा देतील, असे म्हटले होते. नव्या पंतप्रधान पदाच्या निवडीपर्यंत थेरेसा मे या पंतप्रधानपदी कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, मंगळवारी त्या अखेरची मंत्रिमंडळाची बैठक घेतील. त्यानंतर राणी एलिझाबेथ यांच्याकडे त्या आपला राजीनामा सोपवतील. त्यानंतर पुढील पंतप्रधानाच्या नावाची घोषणा केली जाईल. बोरिस जॉन्सन हे बुधवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभारही सांभाळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 5:14 pm

Web Title: boris johnson next pm of britain theresa may resigns jud 87
Next Stories
1 उत्तराखंड सरकारचा आळशी सरकारी कर्मचाऱ्यांचा दणका, देणार सक्तीची निवृत्ती
2 भारत-पाकिस्तानमध्ये चर्चेने काश्मीर प्रश्न सुटणार नाही – इम्रान खान
3 धक्कादायक! दहा वर्षांनंतर सुपरमार्केटमध्येच सापडला बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचा मृतदेह
Just Now!
X