News Flash

स्वातंत्र्यदिनी दुचाकीवर पाकिस्तानचा झेंडा लावणे पडले महागात

यमन अली नावाच्या या कॉलेज तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फाईल फोटो

७० व्या स्वातंत्र्य दिनी संपूर्ण देश तिरंगामय झालेला असताना एक तरुण मोटारसायकलवर पाकिस्तानचा झेंडा मिरवत फिरत होता. हे दृश्य पाहून लोकांचा संताप अनावर झाला. संतापलेल्या लोकांनी या तरुणाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. त्याची मोटारसायकलदेखील जाळली. आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये घडलेल्या या घटनेची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. आसामसह संपूर्ण देशात ७० वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. याच दरम्यान एक १९ वर्षीय तरुण त्याच्या मोटारसायकलवर पाकिस्तानी झेंड्याचे छायाचित्र लावून फिरत होता. हे दृश्य पाहून संताप अनावर झालेल्या प्रत्यक्षदर्शींनी त्या युवकाला चोप देऊन त्याची मोटारसायकलदेखील पेटवून दिली. यमन अली नावाच्या या कॉलेज तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याचे पाकिस्तानातील आयएसआय गुप्तचरसंस्थेशी संबंध आहेत का, याचादेखील पोलीस तपास करत आहेत. आपले वडील नसीरुद्दीन मियाँ यांनीदेखील पाकिस्तानचा झेंडा फडकाविल्याचे त्याने चौकशीत सांगितल्याचे माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांनादेखील ताब्यात घेतले. दोन गटांमध्ये हिंसा भडकाविणे आणि धार्मिक सलोख्याला ठेच पोहचविण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 1:08 pm

Web Title: boy beaten by mob over pakistani flag on the two wheeler
Next Stories
1 Video : महिलेला मारहाण, झाडाला बांधून केस कापले
2 महिलांनी बुरखा जाळून साजरा केला इसिसपासून मुक्ततेचा आनंद!
3 दलितांचा संघ जिंकायला लागल्यामुळे कबड्डीच्या सामन्याला हिंसक वळण
Just Now!
X