News Flash

गेम खेळताना मोबाईल हिसकावून घेणाऱ्या वडिलांचा केला खून, मृतदेहाचे केले तीन तुकडे

सोमावारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला धक्कादायक प्रकार

वडिलांचा केला खून

मोबाइलवर गेम खेळताना वडिलांनी मोबाइल काढून घेतल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांचाच खून केल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. बेळगावमधील काकती येथील सिद्धेश्वर नगरमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारस ही काळीज हेलावून टाकणारी घटना घडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी रघुवीर कुंभार या तरुणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशीरा आरोपी मुलगा गेम खेळत होता. त्यावेळी त्याचे वडील शंकर कुंभार यांनी त्याला मोबाइल बाजूला ठेऊन झोप असे सांगितले. त्यानंतरही तो बराच वेळ गेम खेळत राहिला. अखेर त्याच्या वडिलांनी रागातच त्याच्या हातातून मोबाइल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर संतापाच्या भरातच तो मुलगा झोपायला गेला. त्यानंतर त्याने आई झोपलेल्या खोलीला बाहेरुन कडी लावली आणि तिला कोंडून घेतले. नंतर घरातील विळी घेऊन वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. वडिलांचा खून करुन थांबला नाही तर त्याने रागाच्या भरात आपल्या वडिलांच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुवीर हा डिप्लोमाच्या परीक्षेमध्ये तीन वेळा नापास झाला होता. शिक्षण अर्धवटच राहिल्याने तो बेरोजगार म्हणून घरीच असायचा. रघुवीरचे वडील शंकर हे पोलीस दलात कार्यरत होते. तीन महिन्यापूर्वीच ते निवृत्त झाले होते. दोघेही घरीच असल्याने अनेकदा या दोघांमध्ये रघुवीरच्या नोकरीवरुन वाद होत असायचे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा शंकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांचे धड आणि शीर रघुवीरने वेगळे केले होते. ते दृष्य पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला. पोलिसांनी या प्रकरणात रघुवीरला ताब्यात घेतले असून ते पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 1:12 pm

Web Title: boy killed father over mobile game fight scsg 91
Next Stories
1 Chandrayaan-2 ‘विक्रम’चं चंद्रावर हार्डलँडिंग ?
2 लोक मला विचारत आहेत तुम्हाला अटक का झाली?-पी चिदंबरम
3 चोरीला विरोध करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरला चोरांनी धावत्या ट्रेनमधून फेकले, दोन्ही पाय गमावले
Just Now!
X