२०१० मध्ये दहा वर्षांचा एक मुलगा त्याच्या बेपत्ता झाला होता. मात्र त्याला शोधण्यात एक-दोन नव्हे तब्बल २० वर्षांनी यश आलं आहे. दर्पण या चेहरा ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरमुळे या मुलाला त्याचे कुटुंबीय पुन्हा भेटू शकले आहेत.

दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० मध्ये मध्य प्रदेशातून हा मुलगा बेपत्ता झाला होता. मात्र त्याचा शोध लागला आहे. पश्चिम बंगालच्या हावडा या ठिकाणी असलेल्या मुलांच्या एका वसतिगृहात हा मुलगा वास्तव्य करत होता. दर्पण या सॉफ्टवेअरद्वारे त्याचा शोध लागला आहे. ७ ऑक्टोबर २०१० ला हा मुलगा हरवला होता.

तेलंगण पोलिसांकडे चेहरा ओळखण्याचं एक सॉफ्टवेअर आहे. दर्पण हे त्या सॉफ्टवेअरचे नाव आहे.  त्याद्वारे हरवलेल्या मुलांचा शोध घेतला जाऊ शकतो. फोटोद्वारे हा शोध घेतला जातो. जी मुलं हरवली आहेत त्यांचा फोटो आणि त्यांची आत्ताची चेहरेपट्टी कशी आहे यावरुन हा अंदाज बांधला जातो. यामुळेच दहा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा आता दहा वर्षांनी सापडला आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यात हा मुलगा हा मध्य प्रदेशातून हरवलेला मुलगा आहे ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यानंतर जबलपूरमध्ये या मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. या मुलाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर आता हा मुलगा दहा वर्षांनी त्याच्या कुटुंबीयांना भेटू शकला आहे.

मार्च महिन्यात या मुलाचा शोध लागला होता. मात्र करोना आणि लॉकडाउन असल्याने या मुलाला हावडा येथील वसतिगृहातच ठेवण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १२ डिसेंबरला या मुलाला त्याच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आलं.