News Flash

शरीरसंबंधांचा VIDEO लीक झाला आणि प्रेयसीने उचललं टोकाचं पाऊल

'हा व्हिडीओ सर्वत्र फिरत असल्याचे समजल्यानंतर मुलगी निराश झाली होती.'

प्रियकराने शरीरसंबंधांचा व्हिडीओ लीक केल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करुन जीवन संपवले. गुजरातच्या अहमदाबाद शहरातील छारानगरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. मुलीने सोमवारी संध्याकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

“या मुलीच्या प्रियकराने प्रणयाच्या क्षणाचा तो व्हिडीओ त्याच्या तीन मित्रांजवळ लीक केला. त्यांनी तो इतरत्र शेअर केला. मुलीच्या पालकांना हे प्रकरण समजल्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी त्यांनी प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली” अशी माहिती पोलिसांनी दिली.

“हा व्हिडीओ सर्वत्र फिरत असल्याचे समजल्यानंतर मुलगी निराश झाली होती. सोमवारी संध्याकाळी तिने जीवन संपवले. मुलीने आणि प्रियकराने परस्पर सहमतीने हा व्हिडीओ बनवला होता. पण प्रियकराने दगा दिला” अशी माहिती पोलिसांनी दिली. “पॉस्को कायदा आणि बलात्काराच्या आरोपाखाली प्रियकराला अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ पसरवणाऱ्या तीन मित्रांविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौघांपैकी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे” अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 11:55 am

Web Title: boyfriend leaks intimate video teen girl hangs self in gujarat dmp 82
Next Stories
1 “आडनाव गांधी असल्यावर राहुल नावाचा नेताही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास पात्र ठरतो”
2 राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केला ज्योतिरादित्य शिंदेंचा फोटो, म्हणाले…
3 नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या जवानाचा आढळला मृतदेह
Just Now!
X