शाळेत शिकत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांनी ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केली असल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने सर्व मुलांना घराबाहेर खेचून बेदम मारहाण केली. रक्तबंबाळ होईपर्यंत मुलांना मारहाण करण्यात आली. पोलीस पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आंध्र प्रदेशातील ही घटना आहे.

सर्व मुलं शाळेत शिकत असून, एकजण कॉलेजात आहे. सर्व मुलं पॉर्नच्या आहारी गेली होती. सतत आपल्या मोबाइलवर पॉर्न क्लिप्स पाहत असायचे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांनी शेजारी राहणाऱ्या मुलीवर दोन महिने लैंगिक अत्याचार केले. इतकंच नाही तर कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

पीडित मुलीने आपल्या आईने सर्व हकिकत सांगितली, ज्यांनी तिच्या भावाला आणि काहीजणांना याबाबत सांगितलं. कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

बुधवारी जमावाने पाचही मुलांना ताब्यात घेतलं आणि बेदम मारहाण केली. “सर्व मुलं पॉर्नच्या आहारी गेले होते आणि इंटरनेटच्या माध्यमातून सतत पाहत होते. यामधूनच त्यांनी हा गुन्हा केला असावा”, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.