01 October 2020

News Flash

लालूप्रसाद यादव यांच्या मुलाचा पेट्रोल पंपाचा परवाना रद्द

तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर मिलीभगत करून बनावट कागदपत्रे बनवली होती

Tej Pratap Yadav: काही दिवसांपूर्वीच तेजप्रताप यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. तेजप्रताप यांनीही अर्ज केला होता.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणी कमी होताना दिसत नाही. आता लालूप्रसाद यांचे चिरंजीव बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव हे यांना देण्यात आलेला पेट्रोल पंपचा परवाना भारत पेट्रोलियमने (बीपीसीएल) रद्द केला आहे. मात्र, याबाबत बीपीसीएलकडून अधिकृत माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे.

यापूर्वी बीपीसीएलने तेजप्रताप यांना नोटीस जारी करून १५ दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. तुम्हाला पेट्रोल पंपचा परवाना कसा मिळाला, असा प्रश्न बीपीसीएलने तेजप्रताप यांना विचारला होता. तेजप्रताप यांनी या नोटिशीला उत्तर दिले नव्हते.

वर्ष २०११ मध्ये पेट्रोल पंपचा परवाना मिळवण्यासाठी तेजप्रताप यादव यांनी तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर मिलीभगत करून बनावट कागदपत्रे बनवली होती, असा आरोप बिहार भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी केला होता. याप्रकरणी पेट्रेालियम मंत्रालयाने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बीपीसीएलने याप्रकरणी यादव यांना नोटीस बजावली होती.

बीपीसीएलने डिसेंबर २०११ मध्ये पाटणातील बेऊर जिल्ह्यातून पेट्रोल पंपसाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी तेजप्रताप यांनीही अर्ज केला होता. त्यानंतर तेजप्रताप यांना पेट्रोल पंपाचे वाटपही करण्यात आले होते. ज्या जमिनीच्या आधाराव तेजप्रताप यांना पेट्रोल पंप वितरीत करण्यात आला होता. ती जमीन नंतर वादात अडकली होती.

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि तेजप्रताप यांचे भाऊ तेजस्वी यादव यांनी लवकरच याप्रकरणी भाष्य करू असे माध्यमाशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर ही एकतर्फी कारवाई करण्यात येत असून सत्य लवकरच बाहेर येईल, असेही त्यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2017 1:12 pm

Web Title: bpcl terminates licence of lalu prasad yadavs son tej pratap yadavs petrol pump
Next Stories
1 ‘आप’च्या नेत्यांचा ‘विश्वास’ उडाला!; कुमार ‘गद्दार’ असल्याचे पोस्टर झळकले
2 उघड्यावर शौचास बसलेल्या महिलेचे फोटो काढण्यास विरोध, अधिकाऱ्यांनी घेतला जीव
3 पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोची मेट्रोचे उद्घाटन; ई.श्रीधरन, व्यंकय्या नायडूही सोहळ्याला उपस्थित
Just Now!
X