पोखरण, राजस्थान: लष्कराने ३०० कि.मी. पल्ल्याच्या ब्राह्मोस या स्वप्नातीत क्रूझ क्षेपणास्त्राची जमिनीवरील चाचणी यशस्वी रीत्या घेतली आहे. सकाळी दहा वाजता हे क्षेपणास्त्र राजस्थानातील पोखरणच्या चाचणी क्षेत्रातून सोडण्यात आले. त्याने अचूक लक्ष्य भेदले. फिरत्या प्रक्षेपकावरून ब्राह्मोस क्षेपणास्त्र सोडण्यात आले. प्रशिक्षित लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. त्यात सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाल्याचे सांगण्यात आले. ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली ही अतिशय विनाशक व सक्षम शस्त्रप्रणाली मानली जाते. ब्राह्मोस एअरस्पेसचे प्रमुख सुधीर मिश्रा यांनी सांगितले, की ही चाचणी यशस्वी झाली असून क्षेपणास्त्राची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.