25 January 2021

News Flash

लसीमुळे मगर व्हाल म्हणणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचं मोदींना पत्र; म्हणाले, ‘आम्हाला दोन कोटी डोस तात्काळ द्या’

लस देण्याची केली मागणी

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो व पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छायाचित्र/रॉयटर्स)

करोनावरील लस घेतली, तर माणसं मगर होतील आणि महिलांना दाढी येईल, असं विधान करणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी आता लसीसाठी भारताकडे मदत मागितली आहे. बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीसाठी पत्र लिहिलं आहे. ब्राझीलला दोन कोटी डोस तात्काळ द्यावेत, अशी विनंती बोलसोनारो यांनी केली आहे. भारताने करोनावरील दोन लसींना आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे.

भारतात करोनाच्या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा, असं आवाहन बोलसोनारो यांनी केलं आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्रॉझेनेकाच्या लसीला परवानगी मिळालेली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार केली जात आहे.

भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे. बोलसोनारो यांचं पत्र त्यांच्या माध्यम कार्यालयाने प्रसिद्ध केलं आहे. “ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे,” असं बोलसोनारो यांनी पत्रात म्हटलं आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये करोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

करोनाचा शिरकाव झाल्यानंतर बोलसोनारो यांनी अनेकदा अजब विधानं केली होती. करोनावरील लसीसंदर्भातील त्यांचं एक विधान प्रचंड गाजलं होतं. “फायझर-बायोएनटेकची लस घेतली, तर माणसं मगर होतील आणि बायकांना दाढी येईल. लस घेऊन तुमची मगर झाली, तर तो तुमचा प्रश्न असेल, तुमचं तुम्ही पहा,” असं अजबगजब विधान त्यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 1:35 pm

Web Title: brazil president bolsonaro writes to pm modi seeking 2 million covid vaccine doses urgently bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 अंधार असल्यानं रस्ता चुकला; चीनकडून ‘त्या’ सैनिकाला सोडण्याची मागणी
2 पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट; ‘गोएअर’ने पायलटला तडकाफडकी कामावरून काढले
3 इंडोनेशियात विमान समुद्रात कोसळले, ६२ जणांना जलसमाधी
Just Now!
X