ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी आपल्याला करोनाची लागण झाल्याचं जाहीर केलं आहे. मंगळवारी बोलसोनारो यांनी ब्रासिलीया या राजधानीमधून राहत्या घरातून टिव्हीद्वारे जनतेला आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली. आपला करोना अहवाल पॉजिटीव्ह आला असला तरीही आपली तब्येत चांगली आहे आणि आपण उपचार घेत असल्याचं बोलसोनारो यांनी जाहीर केलं. लॉकडाउनसंदर्भातल्या नियमांमध्ये वारंवार बदल करण्यावरुन बोलसोनारो यांच्यावर याआधी टीका करण्यात आली होती.

टिव्हीवरुन जनतेशी संवाद साधत असताना बोलसोनारो यांनी, रविवारी आपल्याला बरं वाटेनासं झालं असं सांगितलं. सोमवारी तब्येत बिघडल्यानंतर बोलसोनारो यांना ताप आला. यानंतर बोलसोनारो यांची चाचणी करण्यात आली, ज्या चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. मात्र आपली तब्येत चांगली आहे हे दाखवण्यासाठी मास्क घालून बोलसोनारो यांनी जनतेला संबोधित केलं. या खडतर काळात आपल्याला वृद्ध लोकं आणि आजारी असलेल्यांची काळजी घ्यावी लागणार आहे असंही बोलसोनारो म्हणाले.

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”

ब्राझीलमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभरासाठी बोलसोनारो आराम करणार असून त्यांनी आपली सर्व काम रद्द केली आहेत. करोना विषाणूसंदर्भात बोलसोनारो यांच्या सरकारने योग्य उपाययोजना राबवल्या नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. सुरुवातीचया टप्प्यात बोलसोनारो यांनी करोनाला Little Flue असं म्हणत सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांमध्ये शिथीलता आणली होती. यामुळे ब्राझिलमध्ये करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं बोललं जातंय. अमेरिकेनंतर ब्राझील हा करोनामुळे हानी झालेला दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे. याआधीही बोलसोनारो यांची ३ वेळा करोना चाचणी झाली होती, तिन्ही वेळा या चाचणीचा निकाल निगेटीव्ह आला होता.