14 August 2020

News Flash

ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांना करोनाची लागण

बोल्सोनारो मुखपट्टी न वापरता ते गर्दीत मिसळत होते, हस्तांदोलनही करीत होते.

संग्रहित छायाचित्र

 

करोना हा फ्लूचा किरकोळ विषाणू आहे, अशी संभावना करणारे ब्राझीलचे अध्यक्ष याइर बोल्सोनारो यांची कोविड १९ चाचणी सकारात्मक आली असून त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी ब्राझीलमध्ये करोनाची साथ हाताळताना अत्यंत निष्काळजीपणाचे धोरण ठेवले असून टाळेबंदी लागू करण्यासही विरोध केला होता.

ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे.  करोना संसर्ग झाल्यानंतर त्यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी अगदी ठणठणीत असून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या घेत आहे. बोल्सोनारो हे ६५ वर्षांचे असून त्यांनी आतापर्यंत कुठल्याही शिफारशींचे पालन केले नाही. मुखपट्टी न वापरता ते गर्दीत मिसळत होते, हस्तांदोलनही करीत होते. लक्षणे दिसल्यानंतर मात्र त्यांनी सामाजिक अंतराचा निकष सोमवारपासून पाळून मुखपट्टी परिधान करण्यास सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:43 am

Web Title: brazilian president bolsonaro contracted coronavirus abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेतून लवकरच पाठवणी
2 पुलवामा हल्ल्याप्रकरणी आणखी एकाला अटक
3 भारतात करोना मृत्यूदर सर्वात कमी
Just Now!
X