26 February 2021

News Flash

Breaking : टूलकिट प्रकरण; दिशा रवीला न्यायालयाकडून मोठा दिलासा

न्यायालयाकडून जामीन मंजूर

संग्रहित छायाचित्र

शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दिशाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांनी मागणी फेटाळून लावत दिशाला जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक टूलकिट स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवी हिला बंगळुरूतील तिच्या घरून अटक केली होती. अटक केल्यानंतर दिशाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडी एका दिवसाने वाढण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी आज दिशाला पटियाला हाऊस सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी दिशाला दोन हमीदारांसह एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

काय आहे आरोप?

शेतकरी आंदोलनासंदर्भात ग्रेटा थनबर्गने जी टूलकिट ट्विट केली होती. त्या टूलकिट संदर्भात दिशाला प्रमुख संयशित आरोपी म्हणून अटक करण्यात होती. शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिटमध्ये दिशाने बदल केले. त्यात काही मुद्दे टाकले आणि ती टूलकिट पुढे पाठवली, असा आरोप दिल्ली पोलिसांनी तिच्यावर केलेला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलीस दिशासह निकीता जेकब आणि शंतनू मुळूक यांचीही चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 4:04 pm

Web Title: breaking a delhi sessions court grants bail to disha ravi in toolkit fir bmh 90
Next Stories
1 पाच राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करात केली कपात; ‘या’ राज्यात सात रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल
2 पंतप्रधान मोदींनी सांगितलं कधी होऊ शकते चार राज्यांमधील निवडणुकीच्या तारखेची घोषणा
3 …म्हणून वाढलेत पेट्रोल, डिझेलचे भाव; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सोनियांना महाराष्ट्राचं उदाहरण देत सुनावलं
Just Now!
X