News Flash

मोदींच्या सभेतील बॉम्बस्फोटाप्रकरणी चौघांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेआधी पाटणामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी चार संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) अटक केली आहे.

| May 21, 2014 03:06 am

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेआधी पाटणामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी चार संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) अटक केली आहे.
या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या हैदर अली याच्यासोबत नुमान, तौफिक आणि मुजिबल्ला अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चौघांचा शोध घेण्यासाठी पाच लाखांचे बक्षिसही एनआयने जाहीर केले होते. अखेर रांची पोलीस आणि एनआयएने रचलेल्या सापळ्यात या चौघांना अटक करण्यात आली.
मागील वर्षी २७ ऑक्टोबर रोजी पाटणा येथील गांधी मैदानात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटाचे सुत्रधार असल्याचा आरोप अटक करण्यात आलेल्या चौघांवर आहे. बॉम्बस्फोटाची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने जीवीतहानी झाली नव्हती. परंतु, मोदींच्या सभेआधी हे बॉम्बस्फोट झाल्याने देशात खळबळ उडाली होती.
अटक करण्यात आलेल्या चौघांची सध्या ‘एनआयए’कडून सखोल चौकशी सुरू आहे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 3:06 am

Web Title: breakthrough in patna serial blasts four suspects arrested
Next Stories
1 मोदींच्या शपथविधीसाठी नवाझ शरीफ यांना आमंत्रण
2 मोदींचा शपथविधी २६ मे रोजी
3 शिवसेनेला मुख्यमंत्रिपदच हवे
Just Now!
X