05 March 2021

News Flash

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मताधिक्य गमावले

ब्रेग्झिट रखडण्याची चिन्हे;  काही आठवडय़ांत निवडणुकांची शक्यता

ब्रेग्झिट रखडण्याची चिन्हे;  काही आठवडय़ांत निवडणुकांची शक्यता

वृत्तसंस्था, लंडन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदेतील त्यांचे काठावरचे मताधिक्य गमावले असून त्यामुळे काही आठवडय़ांत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत, तसेच ‘ब्रेग्झिट’ची मुदत पाळण्यात अडथळे येणार आहेत.

युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठीच्या ‘ब्रेग्झिट’ योजनेला पुढे रेटण्यासाठी जॉन्सन बोलत असतानाच त्यांच्या हुजूर पक्षाचे खासदार फिलीप ली हे विरोधी मजूर पक्षाच्या आसनांकडे गेले आणि त्यांनी जॉन्सन यांच्याविरोधात मत दिले. त्यामुळे जॉन्सन यांचे मताधिक्य घटले.

जॉन्सन यांची योजना ही ब्रिटनच्या भावी पिढय़ांचे जीवनमान धोक्यात आणणारी आहे. १९ वर्षांपूर्वी मी ज्या हुजूर पक्षाचा सदस्य होतो तो पक्ष आता उरलेला नाही. आता तत्त्वांना मूठमाती मिळाली असून संधीसाधूपणाला ऊत आला आहे, अशी टीका ली यांनी केली आहे.

संसदेच्या पटलावर जर बहुमत सिद्ध करता आले नाही, तर काही आठवडय़ांतच निवडणुका घ्याव्या लागतील, असा इशारा जॉन्सन यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी आधीच दिला होता.

मात्र युरोपीय समुदायाकडून आणखी मुदतवाढ घेण्याऐवजी १४ ऑक्टोबपर्यंत सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी जॉन्सन यांनी केल्याचे समजते. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळाले, तर ब्रेग्झिट योजना ३१ ऑक्टोबपर्यंत संमत करून घेणे साधेल, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे मत आहे.

युरोपीय समुदायाची या संबंधातील परिषद १७ ऑक्टोबरपासून होत आहे. तोवर जर निवडणुका घेण्यात अपयश आले, तर ‘ब्रेग्झिट’साठी ३१ जानेवारी २०२०ची मुदत मागण्याची पाळी जॉन्सन यांच्यावर येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 2:10 am

Web Title: brexit boris johnson loses parliamentary majority zws 70
Next Stories
1 शिवकुमार यांना अटक!
2 अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे पाकिस्तानचे धोरण कायम
3 मनमोहन सिंग यांची आर्थिक टीका अमान्य
Just Now!
X