News Flash

विवाहसमारंभात गोळीबार; उपचारानंतर जखमी वधू मंडपात दाखल

लग्न सोहळयात वधूवरच गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात आरोपीने वधूवर गोळीबार केला. यात नववधूच्या पायाला गोळी लागली.

लग्न सोहळयात नवरी मुलीवरच गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी दिल्लीच्या शाकारपूर भागात लग्नसोहळा सुरु असताना अज्ञात आरोपीने नवरीवर गोळीबार केला. यात नवरी मुलीच्या पायाला गोळी लागली. जखमी वधूला लगेच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे सांगितल्यानंतर नवरी मुलगी पुन्हा मंडपात आली व विवाहाचे विधी पूर्ण केले.

लग्न सोहळयात झालेल्या गोळीबाराची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोळीबार कोणी केला ते ठाऊक नाही असे वधू आणि वराने एएनआयशी बोलताना सांगितले. पोलिसांनी विविध कलमातंर्गत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लग्नात गोळीबार होण्याची ही पहिली वेळ नाही.

याआधी दक्षिण दिल्लीत लग्नाची वरात विवाहस्थळाच्या दिशेने चाललेली असताना दोन आरोपींनी नवऱ्या मुलावर गोळया झाडल्या होत्या. या गोळीबारात नवऱ्या मुलाच्या उजव्या हाताला गोळी लागली होती. त्यावेळी सुद्धा तीन तासाच्या उपचारानंतर नवऱ्याने मंडपात परतून विवाहाचे विधी पूर्ण केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 12:45 pm

Web Title: bride shot by unidentified people in delhis shakarpur during her wedding
Next Stories
1 त्या बीएसएफ जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
2 हिमकडा कोसळला, बर्फाखाली १० जण अडकले
3 भाजपाचे #5YearChallenge, वाचला मोदी सरकारने केलेल्या कामाचा पाढा
Just Now!
X