माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते ब्रिज बेदी (वय ७६) यांचे शनिवारी गुडगावमधील एका रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
ब्रिज बेदी यांना मूत्राशयाचा कर्करोग होता. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्यावर अमृतसर व दिल्ली येथे उपचार सुरू होते. २८ जानेवारीला त्यांना अमृतसरच्या फोर्टिस- एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमधून मेदांता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येऊन अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले, अशी माहिती किरण बेदी यांनी दिली.
अमृतसर शहरावर निरतिशय प्रेम करणारा माणूस या शहराने गमावला आहे. त्यांनी आयुष्यभर गरजूंना मदत करण्याचे काम केले, असे किरण बेदी ट्विटरवर म्हणाल्या.