News Flash

ब्रिटनमध्ये दीपावली उत्साहात साजरी

ब्रिटनमध्ये दिवाळी तेथील भारतीय समुदायाने थाटात व उत्साहात साजरी केली. अनिवासी भारतीयांनी मिठाई वाटली, एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

| November 4, 2013 02:29 am

ब्रिटनमध्ये दिवाळी तेथील भारतीय समुदायाने थाटात व उत्साहात साजरी केली. अनिवासी भारतीयांनी मिठाई वाटली, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. प्रकाशाचा तिमिरावर विजय असा या सणाचा अर्थ आहे. लोकांनी उडवलेल्या फटाक्यांनी रात्रीच्या वेळी आसमंत उजळून गेला होता. राम जेव्हा रावणाचा पराभव करून आला त्याची एक कथा रामायणात आहे त्यानिमित्तानेही दिवाळी साजरी केली जाते. अनेक गावांतील लोकांनी त्यांच्या गावातील रस्ते दिव्यांनी उजळून टाकले होते. दिवे, मेणबत्त्या लावल्या होत्या. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
    आपण ब्रिटनमधील व जगातील दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वाना शुभेच्छा देतो. शिखांमध्ये बंदी छोर सण साजरा केला जातो त्यांनाही शुभेच्छा देतो. दिवाळीमुळे लोक, कुटुंबे एकत्र येतात व धार्मिक सण उत्साहाने साजरा करतात ही चांगली प्रथा आहे. दिवाळी व बंदी छोर यांचे उगम वेगळे असले तरी त्यांचा वैश्विक संदेश एकच आहे. दिवाळीचा संदेश आशेचा आहे. प्रकाशाचा आहे यात शंका नाही. चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून दिवाळी साजरी केली जाते असे त्यांनी म्हटले आहे.
    इद अल् अधा, चानुख, दिवाळी व बंदी छोर हे सण सारखीच मूल्ये सांगणारे आहेत. हिंदूू, जैन, बौद्ध बांधवांनी ब्रिटनच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे असे ते म्हणाले. विज्ञान, लोकसेवा, कला, खेळ अशा अनेक क्षेत्रात या समुदायाचे लोक चमकले आहेत. अनिवासी भारतीय उद्योगपती हिंदुजा बंधू यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळी स्वागत समारंभ ठेवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:29 am

Web Title: britain celebrates diwali in enthusiasm
टॅग : Diwali
Next Stories
1 पाकिस्तानच्या अध्यक्षांकडून हिंदूंना दिवाळी शुभेच्छा
2 जास्त आवाजाचे फटाके उडविणाऱ्यांना अटक
3 अभिनेत्री श्वेता मेननची काँग्रेस खासदाराविरुद्ध फिर्याद दाखल
Just Now!
X