ब्रिटनमध्ये युरोपीय महासंघाच्या संसदेबाहेर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. काळी पँट आणि राखाडी रंगाचा शर्ट घातलेला आणि दाढी असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला आहे.
लंडनमध्ये युरोपीय महासंघाच्या संसदेबाहेरील संरक्षक भिंतीजवळ एक तरुण संशयास्पदरित्या फिरत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर संसदेचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले होते. संशयिताकडे चाकू सापडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चौकशीनंतर पोलिसांनी या घटनेचा दहशतवादाशी संबंध नाही असे स्पष्ट केले. संशयित तरुण ३० वर्षाचा असून त्याची चौकशी सुरु असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, घटनेनंतर संसदेच्या आवारातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान काही काळ संसदेचे प्रवेशद्वार करण्यात आल्याने अनेक जण आत अडकले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 16, 2017 5:09 pm