25 September 2020

News Flash

भारतीय वंशाचे वैज्ञानिक विर्दी यांना ‘नाइटहूड’

भारतीय वंशाचे भौतिकशास्त्रज्ञ व लार्ड हैड्रॉन कोलायडर या हिग्ज-बोसॉन कणाच्या शोधाच्या प्रयोगात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले वैज्ञानिक तेजिंदर विर्दी यांना ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी

| June 16, 2014 12:35 pm

भारतीय वंशाचे भौतिकशास्त्रज्ञ व लार्ड हैड्रॉन कोलायडर या हिग्ज-बोसॉन कणाच्या शोधाच्या प्रयोगात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले वैज्ञानिक तेजिंदर विर्दी यांना ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नाइटहूड किताब दिला आहे. तेजिंदर विर्दी हे लंडनच्या प्रख्यात इंपिरीयल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या जन्मदिनानिमित्त ‘नाइट बॅचलर’ किताब दिले जातात, त्याची यादी काल सायंकाळी जाहीर झाली. त्यात विर्दी यांचा समावेश आहे.
प्रा. विर्दी हे इंग्लंडमधील एक प्रथितयश भौतिकशास्त्रज्ञ असून कॉम्पॅक्ट म्युऑन सॉलेनॉइड (सीएमएस)प्रयोगाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत व त्यांनी विज्ञानात दिलेले योगदान मोलाचे आहे, असे त्यांच्या मानपत्रात म्हटले आहे. सीएमएस प्रयोग हा जीनिव्हात सर्नच्या लार्ड हैड्रॉन कोलायडर मध्ये करण्यात आलेल्या तीन प्रयोगांचा एक भाग होता. कण भौतिकीमध्ये त्यांनी संशोधन केले असून विज्ञान शिक्षण लोकप्रिय करण्यासाठी भारत व आफ्रिकेत काम केले आहे. विर्दी यांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढल्यामुळे अणूच्या सूक्ष्म कणांचे विश्लेषण करणे शक्य झाले. त्यांचे सहकारी टॉम किबल यांनाही ‘नाइट’ किताब मिळाला आहे.
भारतीय वंशाचे दुसरे वैज्ञानिक अनुपम ओझा यांना ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ किताब मिळाला आहे ते नॅशनल स्पेस अ‍ॅकॅडमीचे संचालक आहेत. ऑस्कर विजेता अभिनेता डॅनियल डे लेविस यांना ‘सर’, संयुक्त राष्ट्रांच्या दूत असलेल्या अँजेलिना जोली यांना ‘डेम’, मॅगी स्मिथ यांना ‘कंपॅनियन्स ऑफ ऑनर’ व लेखिका हिलरी मँटेल,फॅशन डिझायनर झँड्रा ऱ्होड्स यांना ‘डेम्स’ किताबाने गौरवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 12:35 pm

Web Title: british indian physicist gets knighthood from queen
Next Stories
1 डेव्हिड रॉकफेलर विमान अपघातात मृत्यमुखी
2 संक्षिप्त :अधिकाऱ्याच्या हत्येवरून ममतांची विरोधकांवर टीका
3 चर्चा हवी असेल, तर हल्ले थांबवा – जेटली
Just Now!
X