ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे ब्रेग्झिटवरुन संसदेच्या निशाण्यावर राहण्याची शक्यता आहे. ब्रेग्झिटप्रकरणी ११ डिसेंबरला मतदान होणार असल्याचे मे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यूरोपीयन यूनियनच्या देशांनी रविवारी ब्रेग्झिट कराराला मंजुरी दिली. आता हा करार ब्रिटिश संसदेच्या मंजुरीनंतर लागू केला जाईल.

ब्रसेल्सबरोबर मागील दोन वर्षांपासून या कराराबाबत सुरु असलेली चर्चेची प्रक्रिया खूप जटील आणि दुख:दायी राहिली. अनेकवेळा करार होऊ शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती.

आता मे यांच्यासमोर शेवटची आणि मोठी अडचण दूर करण्याचे आव्हान आहे. त्यांना ब्रिटिश संसदेत हा करार मंजूर करुन घ्यावा लागणार आहे. मे यांचेच अनेक खासदार अजूनही याला मोठा विरोध करत आहेत.