07 July 2020

News Flash

समलिंगींना दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा

ब्रुनेईमध्ये नवीन शरिया कायदा

ब्रुनेई सुल्तान हस्सानाल बोल्किआ Photo Credit: AFP

ब्रुनेईमध्ये नवीन शरिया कायदा

ब्रुनेई : समलिंगी संबंध आणि व्यभिचारासाठी ब्रुनेई येथे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा नवीन शरिया कायद्यानुसाार संमत केली आहे. ब्रुनेईमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्य़ांसाठी शरिया कायद्यानुसार कडक शिक्षा जाहीर करण्यात आल्या असून जागतिक स्तरावरील राजकारणी, मानवी हक्क गट आणि प्रसिद्ध व्यक्तींनी या शिक्षांचा निषेध केला आहे.

ब्रुनेईवर सध्या सुल्तान हस्सानाल बोल्किआ यांची सत्ता आहे. राष्ट्रीय स्तरावर शरिया कायदा लागू करणारा मध्य पूर्व आशियामधील ब्रुनेई हा पहिलाच देश आहे. चोरी करणाऱ्यांचे हात-पाय छाटण्याची आणि बलात्कार आणि दरोडय़ासाठीही देहांताची शिक्षा या कायद्यानुसार ठोठावण्यात येणार आहे. तर प्रेषित महंमद यांचा अपमान करणाऱ्या मुस्लीम अथवा बिगर मुस्लिमांना फाशीची शिक्षा ठोठावली जाईल.

या शिक्षा ‘क्रूर आणि अमानवी’ आहेत अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांनी निषेध केला आहे. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि पॉप स्टार इल्टॉन जॉन यांनी ब्रुनेईच्या बालकीच्या हॉटेल्सवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

या देशात इस्लामची शिकवण दृढ झालेली पाहायची आहे, असे वक्तव्य सुलतान बोल्किआ यांनी देशातील लोकांसमोर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2019 12:49 am

Web Title: brunei introduces death by stoning for gay sex
Next Stories
1 कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचे स्थानिक बंड कायम
2 ‘नासा’च्या आरोपाला अमेरिकी प्रशासनाचे महत्त्व नाही
3 भारताच्या अवकाश कचऱ्यावर पाकिस्तानकडूनही चिंता व्यक्त
Just Now!
X