News Flash

ब्रसेल्समधील बेपत्ता राघवेंद्र गणेश यांच्या मोबाईल सिग्नलचा मेट्रोपर्यंत माग

राघवेंद्र गणेश हे मूळचे भारतातील बेंगळुरूमधील असून ते इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत.

राघवेंद्र गणेशन हे मूळचे भारतातील बेंगळुरूमधील असून ते इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत.

ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यांनंतर बेपत्ता असलेल्या राघवेंद्र गणेश त्या दिवशी बेल्जियममधील मेट्रोमधून प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडील मोबाईलचे सिग्नल तपासल्यानंतर बेल्जियममधील मेट्रोपर्यंत त्यांचा माग निघत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी सांगितले. ब्रसेल्समधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून गणेश यांचा शोध घेण्यात येतो आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतो आहे, असेही सुषमा स्वराज यांनी सांगितले. राघवेंद्र गणेश हे मूळचे भारतातील बेंगळुरूमधील असून ते इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत.
दरम्यान, ब्रसेल्समध्ये बॉम्बस्फोट झालेल्या घटनास्थाळावरून १५ किलो दारुगोळा सापडला असून या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे. विमानतळावर विस्फोटक सामग्रीसह असलेला तिसरा संशयित पळाल्याचे फ्रेडल अधिवक्तयाने बुधवारी स्पष्ट केले. तिसरा मनुष्य विमानतळावर होता आणि त्याने त्याची बॉम्ब असलेली बॅग विमानतळावरच सोडल्याचे फ्रेडेरिक वॉन लू म्हणाले. संशयिताने काळी टोपी आणि पांढरा कोट चढवला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे. त्याची ओळख अद्याप पटायची असून, त्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सापडलेल्या संशयितांमध्ये इब्राहिम अल बक्राउ आणि त्याचा भाऊ खालिदचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2016 3:36 pm

Web Title: brussels attack last call of missing indian tracked to metro says sushma swaraj
टॅग : Terror Attack,Terrorism
Next Stories
1 बाळासाहेबांवर हल्ल्याचा प्रयत्न ‘लष्कर-ए-तोयबा’ने केला होता, हेडलीची कबुली
2 कन्हैयाकुमारची रोहितच्या आईला भेटून न्याय मिळवून देण्याची शपथ
3 कारागृहात मोबाईल, विडी व तंबाखूजन्य पदार्थासह कांदे, बटाटे, लसणाची चटणीही
Just Now!
X