ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या दोन बॉम्बस्फोटात जेट एअरवेजचे दोन कर्मचारी जखमी झाले आहे. कंपनीनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून, दोन्ही कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जखमी कर्मचाऱ्यांनी नावे उपलब्ध झालेली नाहीत.
जेट एअरवेजच्या सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, त्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर विमानतळाचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला असून, विमान सेवेचे कर्मचारी किवा प्रवासी कोणालाही विमानतळाच्या परिसरात जाऊ देण्यात येत नाही. जेट एअरवेजचे व्यवस्थापन ब्रुसेल्समधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. ब्रुसेल्सकडे जाणारी विमानसेवा जेट एअरवेजने बुधवारपर्यंत स्थगित केली आहे.