News Flash

BSf Jawan Tej Bahadur: चौकशी करण्याऐवजी जेवणाची व्यथा मांडणा-या जवानाला मनोरुग्ण ठरवण्याचा डाव ?

तेज बहादूरचे झाले होते समुपदेशन

तेज बहादूर यादवचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांना मिळणा-या नित्कृष्ट जेवणाची व्यथा मांडणा-या बीएसएफच्या जवानाची कारकिर्द वादग्रस्त असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी त्या जवानावर चार वेळा शिस्तभंगाची कारवाई झाल्याची माहिती बीएसएफमधील सूत्रांनी दिली आहे.

सीमा सुरक्षा दलातील तेज बहादूर यादव या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तेज बहादूरने जवानांना मिळणा-या जेवणाचा दर्जा सुमार असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारकडून देशभक्तीचे दाखले दिले जात असताना जवानांना मिळणा-या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले होते. मात्र आता या प्रकरणाला नवीन वळण देण्याचा प्रयत्न होत आहे.

बीएसएफमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेज बहादूरची कारकिर्द वादग्रस्त आहे. त्याच्यावर चार वेळा शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. मद्यप्राशन करणे, अधिका-यांसोबत उद्धटपणे वर्तन करणे, वारंवार सुटी घेणे अशा विविध कारणांमुळे तेज बहादूर नेहमीच वादाच्या भोव-यात असायचा असे बीएसएफमधील अधिका-यांचे म्हणणे आहे. तेज बहादूरला शिस्तभंगाप्रकरणी शेवटची झालेली शिक्षा म्हणजे सात दिवसांचा तुरुंगवास होता. बीएसएफ न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली होती. तेज बहादूर यादवने काही दिवसांपूर्वी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्जही दिला आहे.

तेज बहादूर हा १९९६ च्या सुमारास भरती झाला होता. भरती झाल्यापासून त्याला समुपदेशनाची गरज होती. या कारणांमुळेच त्याला बराच काळ बीएसएफच्या मुख्यालयातच तैनात केले जायचे असे सांगितले जाते. १० दिवसांपूर्वीच तेज बहादूरला सीमा रेषेवर पाठवण्यात आले होते. समुपदेशनाचा त्याला फायदा होत आहे का हे तपासण्यासाठीच त्याला पुन्हा सीमा रेषेवर पाठवण्यात आले होते असे बीएसएफचे म्हणणे आहे.
मात्र, तेज बहादूरने मांडलेल्या परिस्थितीवर स्पष्टीकरण देण्याऐवजी बीएसएफकडून त्याला मनोरुग्ण ठरवण्याचा डाव होत असल्याची प्रतिक्रियाही आता व्यक्त होत आहे. तर तेज बहादूरनेही एका वृत्तवाहिनीशी बोलताना बीएसएफच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. मी मनोरुग्ण होतो तर मग मला पुरस्कार कसे मिळाले असा प्रश्नच त्याने उपस्थित केला आहे. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर अहवाल मागवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 12:02 pm

Web Title: bsf jawan tej bahadur yadav is offender of absenteeism chronic alcoholism
Next Stories
1 योगा टाळून पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट
2 Mayawati Brother Assets: ७ वर्षात ७ कोटींची संपत्ती १३०० कोटींवर, मायावतींच्या भावावर आयकर विभागाची नजर
3 मे २०१६ मध्येच मिळाली होती २ हजारच्या नवीन नोटांना मंजुरी
Just Now!
X