News Flash

त्या बीएसएफ जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे चर्चेत आलेले सीमा सुरक्षा दलाचे जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशायस्पद मृत्यू झाला आहे.

जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे चर्चेत आलेले सीमा सुरक्षा दलाचे जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. हरयाणा रेवाडीमधील शांती विहार येथे तेज बहादूर यादव यांचे घर आहे. त्यांचा मुलगा रोहित राहत्या घरी मृतावस्थेत आढळला.

रोहितने आत्महत्या केल्याचा आम्हाला फोन आला. घटनास्थळी पोहोचलो तेव्हा खोलीचा दरवाजा आतमधून बंद केलेला होता. मृतदेह बिछान्यावर पडलेला होता. रोहितच्या हातात पिस्तुल होते अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. ही घटना घडली त्यावेळी तेज बहादूर घरी नव्हते. ते कुंभमेळयासाठी प्रयागराजला गेले होते.

पोलिसांनी त्यांना या घटनेबद्दल कळवले आहे. जानेवारी २०१७ मध्ये तेज बहादूर यादव यांनी सोशल मीडियावर चार व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये त्यांनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करताना टीका केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. पण बीएसएफने त्यांचे आरोप फेटाळून लावले होते तसेच त्यांना सेवेतून निलंबितही केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 12:07 pm

Web Title: bsf jawan tej bahadur yadavs son found dead
Next Stories
1 हिमकडा कोसळला, बर्फाखाली १० जण अडकले
2 भाजपाचे #5YearChallenge, वाचला मोदी सरकारने केलेल्या कामाचा पाढा
3 ब्रिटनचे प्रिन्स फिलिप यांच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले
Just Now!
X