News Flash

बीएसएफकडून चार तस्करांना कंठस्नान; कोट्यवधीची हेरॉईन पाकिटे जप्त

पाकिस्तानच्या हद्दीतून पाच जण भारतीय हद्दीत प्रवेश करीत असल्याचे बीएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आले.

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार तस्कर ठार झाले.

पंजाबध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार तस्कर ठार झाले. त्यात दोन पाकिस्तानी व दोन भारतीय नागरिकांचा समावेश होता. त्यांच्याकडून कोटय़वधी रूपयांची हेरॉईनची १० पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या हॅरोईनची किंमत बाजारात कोटयावधी रुपये आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीतून पाच जण भारतीय हद्दीत प्रवेश करीत असल्याचे बीएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आले. जवानांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, हे पाचही जण पळू जाऊ लागले. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. त्यात चारजण ठार झाले. तर, त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 2:24 pm

Web Title: bsf kills 4 intruders on indo pak border seizes 10kg heroin
टॅग : Bsf
Next Stories
1 आयसिसशी संबंधित सव्वालाख ट्विटर खाती बंद
2 नौदलाच्या सामर्थ्यांचे प्रदर्शन
3 प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग यांचे निधन
Just Now!
X