पाकिस्तान भारताच्या कुरापती काढण्यात क्रमांक एकचा देश आहे हे आता जग जाहीर झाले आहे. अशात पाकिस्तानने भारताची आणखी एक कुरापत काढली आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानने बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती आता समोर येते आहे. यामुळे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहगड आणि तनोत या ठिकाणी हे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. ज्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानवर डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानातले आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या डॉनने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान येणाऱ्या आर्थिक वर्षात अंतराळ मोहिमेसंदर्भात ४७० कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता आहे. स्पेस अँड अप्पर अॅटमॉस्टफीअर रिसर्च ऑर्गनायझेशनने ४७० कोटी रूपयांचे बजेट नक्की केले आहे. या ४७० कोटींपैकी २५५ कोटी हे तीन नव्या प्रकल्पांसाठी असणार आहेत अशीही माहिती समोर येते आहे. ‘झी न्यूज’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

भारतावर नजर ठेवण्यासाठी या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान एखादा सॅटेलाइट सोडण्याचीही शक्यता आहे. हा सॅटेलाइट भारतावर नजर ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या सॅटेलाइटची गरज असल्याचे मत पाकिस्तानातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ज्यानंतरच ही सगळी तयारी सुरु करण्यात आल्याचे समजते आहे.

स्पेस टेक्नॉलॉजीला महत्त्व देऊन आम्हाला भारतावर नजर ठेवायची आहे. तसेच काळासोबत चालणे ही आमची गरज आहे. अमेरिका भारताच्या सॅटेलाइट प्रकल्पांना मदत करते आहे. अशात आम्हाला आमचे सॅटेलाइट प्रकल्प राबवून भारतावर नजर ठेवणे आवश्यक वाटते आहे असे पाकिस्तानच्या संरक्षण विश्लेषक मारिया सुल्तान यांनी स्पष्ट केले आहे.

याआधी चीन आणि भारत यांच्यात डोकलामचा प्रश्न चिघळला होता. हा वाद सुमारे ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चालला होता. त्यानंतर हा प्रश्न चर्चेतून सुटला पण त्या दरम्यानच्या काळात चीनने वारंवार युद्धाचीही धमकी दिली होती. आता पाकिस्तानने जे बांधकाम सुरु केले आहे त्यावरून काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.