News Flash

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसाठी योग कार्यशाळा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना अनेकदा डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करताना पुरेशी झोपही मिळत नाही.

| April 9, 2015 01:02 am

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना अनेकदा डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करताना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो व ते चिडचिडे बनतात. यावर मात करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकरिता योगाचे वर्ग सुरू करण्यात येणार असून त्यात ताण व्यवस्थापनाचाही समावेश आहे. सीमा सुरक्षा दलात स्त्री व पुरुष काम करीत असतात.
तीस दिवसांच्या योग कार्यशाळेसाठी ब्रह्मा कुमारीज या सामाजिक संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. सीमावर्ती भागात ही कार्यशाळा घेतली जाणार आहे.
झोपेच्या समस्येमुळे जवानांना खूप त्रास होत असतो व काही वेळा त्यांना नैराश्य येते व ते टोकाला जाते. या प्रश्नांचा विचार करता योग व ताण व्यवस्थापनाचा उपयोग होईल, असे मत सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख डी. के. पाठक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, या जवानांसाठी समुपदेशनही केले जाते. देशभरात योगाच्या या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मू-काश्मीरच्या बर्फाळ भागात, राजस्थानसारख्या उष्ण वाळवंटात व पश्चिम बंगालमध्ये काम करावे लागते त्यावेळी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2015 1:02 am

Web Title: bsf starts yoga for troops to combat stress
टॅग : Bsf,Yoga
Next Stories
1 पंतप्रधानांच्या हस्ते ‘मुद्रा बँके’चे उदघाटन, शेतीच्या नुकसान भरपाईत दीटपटीने वाढ
2 येमेनमधील संघर्षांत १४० ठाररेड क्रॉसचा दावा
3 आपत्कालीन सेवांसाठी ‘११२’ क्रमांकाचा ट्रायचा प्रस्ताव
Just Now!
X