News Flash

चिनी कंपन्यांना BSNLची दारं बंद? 4G निविदांसंदर्भातील महत्वाचा निर्णय

चिनी उपकरणं न वापरण्याच्या केंद्राच्या बीएसएनएलला सूचना

(संग्रहित छायाचित्र)

भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालायनं बुधवारी रद्द केल्या. या प्रक्रियेत चिनी कंपन्यांना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या अपग्रेडेशनसाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या दोन महिन्यांत बीएसएनएलकडून 4G अपग्रेडेशनच्या निविदा काढण्यात येणार आहेत. यासाठी सहा जणांची समिती देखील नेमण्यात येणार आहे. या समितीची नियुक्ती झाल्यानंतर या निविदा काढल्या जातील. बीएसएनएलच्या अपग्रेडेशनसाठी कुठल्या सामुग्रीची गरज असणार आहे, याचा अहवालही सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नव्या निविदांमध्ये चिनी कंपन्यांना स्थान असणार नाही. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

केंद्र सरकारने बीएसएनएलला सूचना दिल्या आहेत की, 4G अपग्रेडेशनसाठी चिनी साधनं वापरु नका. साधाराण ७००० ते ८००० कोटींचे हे कंत्राट असणार आहे. भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याकडून झालेल्या झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर चिनी बनावटीच्या वस्तूंवर बंदी घालण्याची जनसामान्यातून मागणी होत आहे. त्यानुसार सरकारनेही हळूहळू पावलंही उचलण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ५९ चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे.

दरम्यान, या नव्या निविदा काढण्यापूर्वी जी सहा जणांची समिती नेमण्यात येणार आहे. त्यामध्ये दूरसंचारविभागातील वरिष्ठ अधिकारी, बीएसएनएल आणि एमटीएनएलचे प्रतिनिधी, दोन स्वतंत्र तज्ज्ञ आणि टेलिकॉम क्षेत्रातील इतर प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. भारताच्या दूरसंचार क्षेत्राचा परदेशी उपकरणांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सध्या ७५ टक्के टेलिकॉम साधनं केवळ ZTE आणि Huawei या दोनच महत्वाच्या कंपन्या पुरवतात. या दोन्ही चिनी कंपन्या आहेत.

दरम्यान, दूरसंचार मंत्रालयाने देशात 5G स्प्रेक्ट्रमची चाचणीप्रक्रिया देखील सुरु केली आहे. यासाठी लागणारी उपकरणे Huawei ही कंपनी पुरवणार आहे. तर दुसरीकडे मंत्रालयाकडून देशातील खासगी टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर कंपन्यांना भारतातच ही उपकरणे तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 5:18 pm

Web Title: bsnl 4g tender scrapped chinese companies may be excluded in next round aau 85
टॅग : India China
Next Stories
1 “महाराष्ट्र सरकारकडे सुशांतच्या मृत्युची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करा”
2 अमेरिकेचाही चीनला दणका; ‘या’ चिनी कंपन्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची केली घोषणा
3 अ‍ॅपबंदीनंतर मोदी सरकारचा चीनला अजून एक दणका
Just Now!
X