पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यात स्नान करण्यावर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुण्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. मायावतींपासून ते अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राज बब्बर यांनी मोदींची ही निवडणुकीसाठीची चाल असल्याचा आरोप केला आहे. मायावतींनी तर गंगा नदीत स्नान केल्याने पाप धुतले जात नाहीत, असा टोला लगावला आहे.

मायावती म्हणाल्या की, मोदी सरकारने जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांचे पाप शाही स्नानामुळे धुतले जाणार नाही. जीएसटी आणि नोटबंदीचा मार सहन करणारी जनता इतक्या सहजपणे सरकारला माफ करणार नाही. मायावतींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, निवडणुकीच्यावेळी शाही स्नान केल्याने मोदी सरकारचे खोटे आश्वासन, जनतेचा विश्वासघात आणि सरकारकडून होत असलेला अन्याय-अत्याचाराचे पाप धुतले जातील का?

नोटबंदी, जीएसटी, द्वेष आणि सांप्रदायिकता आदींचा जबरदस्त त्रास सहन करत असलेले लोक भाजपाला इतक्या सहजपणे माफ करतील का, असा सवाल विचारला आहे.