News Flash

सपा बरोबर कायमची युती तोडलेली नाही, पण पोटनिवडणूक स्वबळावर लढणार – मायावती

बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी समाजवादी पार्टी बरोबरची युती तोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. मायावतींनी समाजवादी पार्टी बरोबर युती तोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा आणि बसपा परस्परांचे कट्टर विरोधक होते. पण लोकसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. पण मोदी लाटेत सपा-बसपा आघाडीचा दारुण पराभव झाला.

राजकीय निकड जी आहे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशच्या निकालाकडे पाहिले तर समाजवादी पार्टीचा मुख्य मतदार असलेल्या यादव समाजाने पक्षाला साथ दिलेली नाही. सपाच्या बलाढय उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला असे मायावतींनी सांगितले.

आम्ही सपा बरोबर कायमस्वरुपी युती तोडलेली नाही. भविष्यात सपाचे प्रमुख अखिलेश यादव त्यांच्या राजकारणात यशस्वी झाले आहेत असे वाटले तर आम्ही पुन्हा एकत्र येऊ. पण ते यशस्वी झाले नाहीत तर स्वतंत्र लढण्यातच फायदा आहे. त्यामुळे पोटनिवडणूक आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे असे मायावतींनी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 11:16 am

Web Title: bsp chief mayawati on sp bsp coalition decided to fight the by elections alone
Next Stories
1 सिगारेट लायटरमुळे फ्रान्समध्ये उलगडला भारतीय नागरिकाच्या हत्येचा गुन्हा
2 AN-32 अजूनही बेपत्ता, दुसऱ्या दिवशीही शोध सुरुच
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X