गोरक्षेच्या मुद्द्यावरून देशात अनेक हिंसाचाराचे प्रकार घडले जे सर्वश्रुत आहेत. गायीचे रक्षण करण्याच्या नावाखाली अनेकदा कथित गोरक्षकांच्या जमावाने मारहाण केल्याचे हे प्रकार देशाच्या विविध भागांमध्ये घडले. आता याच गोरक्षकांना आणि भाजपाला बसपाचे नेते जय पी. सिंग यांनी टोला लगावला. गाय ही तुमची माता असेल आमची नाही असे म्हणत त्यांनी भाजपा आणि कथित गोरक्षकांना टोला लगावला.

गाय एक चांगला प्राणी आहे, गाय कमी खाते आणि जास्त दूध देते. मात्र चांगला प्राणी असलेली ही गाय कोणाचाही आई किंवा माता होऊ शकत नाही. माता कोण असते तर जिने आपल्याला जन्म दिला ती माता असते. गाय तुमची माता असेल आमची माता तर ती आहे जिने आम्हाला जन्म दिला. असे म्हणत जय पी. सिंग यांनी भाजपा आणि कथित गोरक्षकांना टोला लगावला आहे.

बसपा नेते जय पी. सिंग यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते कथित गोरक्षक आणि भाजपाला बोचण्याची चांगलीच शक्यता आहे. आता यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले तर आश्चर्य वाटायला नको.