News Flash

केंद्र सरकारनं तात्काळ लक्ष दिलं तर बरं होईल; मायावतींनी व्यक्त केली चिंता

करोनाच्या प्रसारासाठी त्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत असताना

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती. (संग्रहित छायाचित्र)

देशात करोना आणि लॉकडाउनमुळे देशात अनेक प्रश्न निर्माण झाल्याचं दिसत आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात अर्थचक्र ठप्प झाल्यानं अनेक कंपन्यांना झळ बसली आहे. त्याचबरोबर छोटे व मध्यम उद्योग बंद पडू लागले आहे. देशभरात सायकल उत्पादक कंपनी एटलासही बंद पडणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, त्यावर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी चिंता व्यक्त केली आहे.

देशातील प्रमुख सायकल उत्पादक कंपनी म्हणून एटलास देशभरात प्रसिद्ध आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कंपनीला मोठा फटका बसल्याची वृत्त आहे. भांडवलाअभावी कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असून, बीएसपीच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी याकडे सरकारनं लक्ष देण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा- चिंता वाढली… २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक करोनाबाधित

“लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याची चर्चा केली जात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील एटलाससारखी प्रमुख सायकल उत्पादक कंपनी पैशाअभावी बंद होत असल्याचे वृत्त चिंता वाढवणारे आहे. सरकारनं याकडे तात्काळ लक्ष द्यावं,” असं मायावती यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

आणखी वाचा- “नोव्हेंबरमध्येच भारतात करोनाने केला होता प्रवेश”; शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

करोनाच्या प्रसारासाठी त्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत असताना…

लॉकडाउननंतर देशभरात विविध ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचा रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला. लॉकडाउन लागू झाल्यानं सर्व व्यवहार ठप्प झाले. रोजगार बंद झाला. त्यामुळे लाखो मजुरांनी घराकडे स्थलांतरण केलं. या काळात उत्तर प्रदेश सरकारनं मजुरांना सीमेवरच रोखलं होतं. त्यावरही मायावती यांनी भाष्य केलं. “उत्तर प्रदेशात घरवापसी करणाऱ्या लाखो मजुरांपैकी ३ टक्के मजूर करोनाबाधित आढळून आले आहे. ही खूप मोठा दिलासा देणारी बाब आहे. विशेषतः तेव्हा जेव्हा राज्यात करोना प्रसारासाठी या मजुरांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्या शंकेमुळे या मजुरांच्या घरवापसीसाठी विलंब केला जात होता,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 11:13 am

Web Title: bsp leader mayawati request to govt for help to atlas bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू, मनेका गांधी संतापल्या; राहुल गांधींवर साधला निशाणा
2 चेन खेचत मजुरांनी श्रमिक ट्रेनमधून उड्या मारुन काढला पळ, रेल्वे स्थानकावर उडाला गोंधळ
3 चिंता वाढली… २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक करोनाबाधित
Just Now!
X