News Flash

मोलकरणीच्या मृत्यूप्रकरणी खासदाराची पत्नी ताब्यात

बहुजन समाज पक्षाचे खासदार धनंजय सिंह यांच्या येथील निवासस्थानी मोलकरणीचा मृतदेह आढळल्याने सिंह यांच्या पत्नी

| November 6, 2013 04:38 am

बहुजन समाज पक्षाचे खासदार धनंजय सिंह यांच्या येथील निवासस्थानी मोलकरणीचा मृतदेह आढळल्याने सिंह यांच्या पत्नी जागृती सिंह हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मोलकरणीच्या डोक्यावर अनेक जखमा होत्या. गेली १० महिने ही मोलकरीण त्यांच्या घरी काम करत होती. जागृती सिंह मोलकरणीचा छळ करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेप्रकरणात घरातील इतर नोकरांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र आपल्याला आजच या घटनेची माहिती मिळाली अशी प्रतिक्रिया धनंजय सिंह यांनी दिली आहे. तीन दिवसांपूर्वी पडल्यानंतर ती जखमी झाली आणि नंतर मृत्यू झाला अशी माहिती पत्नीने आपल्याला दिल्याचे धनंजय सिंह यांनी सांगितले. मात्र गेल्या सात महिन्यांपासून धनंजय सिंह यांची पत्नीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:38 am

Web Title: bsp mp dhananjay singh wife arrested over murder of their maid
Next Stories
1 हत्फ-९ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
2 ‘ड्रीमलायनर’च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह
3 सौदीतून १.३४ लाख कामगार मायदेशी
Just Now!
X