05 March 2021

News Flash

मोलकरणीच्या हत्येप्रकरणी खासदार धनंजय सिंह यांच्या पत्नीला अटक

बहुजन समाज पक्षाचे (बसप) खासदार धनंजय सिंह यांच्या पत्नी जागृती सिंह यांच्यावर मोलकरणीची मारहाण करून हत्या केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे

| November 5, 2013 12:38 pm

बहुजन समाज पक्षाचे (बसप) खासदार धनंजय सिंह यांच्या पत्नी जागृती सिंह यांच्यावर मोलकरणीची मारहाण करून हत्या केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीतील साऊथ अवेन्यू भागात असलेल्या एका इमारतीतील खोलीमध्ये राखी या मोलकरणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. मृतदेहाच्या डोके, छाती, पोट आणि हातावर मारहाण केल्याच्या खूणा आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जागृती सिंह यांना अटक केली आहे. तर, धनंजय सिंह यांनी मोलकरणीचा मृत्यू छत डोक्यावर कोसळल्यामुळे झाल्याचे म्हटले आहे. धनंजय सिंह यांचा इतिहास पाहता त्यांनाही याआधी एका दुहेरी हत्याकांडप्रकरणी कारागृहात जावे लागले आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2013 12:38 pm

Web Title: bsp mp dhananjay singhs wife detained following maids death
Next Stories
1 ऐन दिवाळीत रांचीमधून नऊ जिवंत बॉम्ब जप्त
2 भारताच्या मंगळ मोहिमेची उद्दिष्टे…
3 मंगळयानाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले
Just Now!
X