09 March 2021

News Flash

१५ मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बौद्ध भिक्खूला अटक

केंद्राचे संचालक असलेल्या बौद्ध भिक्खूला अटक करण्यात आली, तर इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे

संग्रहित छायाचित्र

१५ मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बौद्ध भिक्खूला अटक करण्यात आली आहे. तसेच या बौद्ध भिक्खूसह आणखी तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्या मुलांचे लैंगिक शोषण झाले आहे त्यांची वयं ७ ते १३ वर्षे अशी आहेत असेही समजले आहेत. बोधगयेत हा धक्कादायक प्रकार घडला. बौद्ध धर्मियांच्या ध्यान धारणा केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबईतून या संदर्भात एका लामाकडून पोलिसांना माहिती मिळाली. ज्यानंतर या मुलांच्या पालकांसह पोलीस बोधगया येथील ध्यान धारणा केंद्रात पोहचले. या केंद्रातील इतर मुलांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या केंद्राचे संचालक असलेल्या बौद्ध भिक्खूला अटक करण्यात आली.

या मेडिटेशन सेंटरमध्ये दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मात्र बौद्ध भिक्खूचे कार्यालय या सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेतून सुटत होते. त्यामुळे या बौद्ध भिक्खूने आपल्या कार्यालयातच बेड रूम थाटले होते. याच ठिकाणी तो लहान मुलांचे लैंगिक शोषण करत असे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. एएसपी राजीव मिश्रा यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.

बौद्ध भिक्खू आम्हाला कार्यालयात बोलवायचा आणि त्यानंतर आमच्यावर अत्याचार करायचा अशी माहिती पीडित मुलांनी दिली आहे. या प्रकरणात पीडित मुलांच्या पालकांनी दोषी बौद्ध भिक्खूला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 4:35 pm

Web Title: buddhist monk held in gaya for alleged sexual abuse of 15 boys
Next Stories
1 Kerala floods : ‘केरळात ४८३ जणांचा मृत्यू; राज्याच्या वार्षिक खर्चापेक्षाही अधिक नुकसान’
2 अत्याचाराच्या घटनांमध्ये ९५ टक्के वेळा चूक मुलींचीच – जैन मुनी विश्रांत सागर
3 काँग्रेसनं दाखवली आरएसएस व मुस्लीम ब्रदरहूडमधली साम्यस्थळं
Just Now!
X