अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थसंकल्प सादर करणारे हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी असंघटीत कामगारांसाठी महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या. असंघटीत क्षेत्रातील २१ हजार पगार असलेल्या कामगारांना ७ हजार बोनसची घोषणा केली आहे. तसेच ग्रॅच्युटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रूपये केल्याचे गोयल यांनी जाहीर केले. याचा १० कोटी असंघटीत कामगारांना फायदा होणार आहे.

नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास देण्यात येणारी मदत अडीच लाखांवरून ६ लाख रूपये इतकी केली आहे. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची घोषणा करताना त्यांनी १५ हजार रूपये कमाई असलेल्या १० कोटी लोकांना या योजनेचा लाभा होणार असल्याचे सांगितले. कामगारांना किमान १००० रूपये पेन्शन मिळेल. कामगारांचे कल्याण हाच आमच्या सरकारचा हेतू असून मागील ५ वर्षांत औद्योगिक शांतता निर्माण करण्यात सरकारला यश आल्याचे ते म्हणाले.

कमी उत्पन्न असलेल्या श्रमिकांना सरकार पेन्शन देणार आहे. १०० रूपये प्रति महिनेच्या अंशदानावर वयाच्या साठीनंतर ३००० रूपये दरमहा पेन्शन देण्यात येईल.