News Flash

Budget 2019: काय झाले स्वस्त आणि काय महागले? जाणून घ्या

काही गोष्टींवरील कर कमी केला असून काही गोष्टींवर अतिरिक्त कर लावण्यात आला आहे

स्वस्त आणि महाग

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करता सीतारमन यांनी काही गोष्टींवर कर वाढवल्याचे तर काही गोष्टींना करमुक्त केल्याचे जाहीर केले. त्यामुळेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत तर काही महाग. चला तर जाणून घेऊयात आजच्या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी झाल्या आहेत महाग आणि कोणत्या झाल्या आहेत स्वस्त

महाग होणार

>
तंबाखूजन्य पदार्थ – गुटखा, सिगरेट, तंबाखू या तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त कर आकारण्यात येणार

>
पेट्रोल-डिझेल – पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये प्रती लिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. प्रती लिटर एक रुपया इन्फ्रास्टक्चर सेस आणि  एक रुपया अतिरिक्त कर वाढवल्याने पेट्रोल-डि़झेलची किंमत दोन रुपयांनी वाढणार आहे

>
डिजीटल कॅमेरा महाग झाले

>
सोने – सोन्यावरील आयात कर १० टक्क्यांवरुन १२.५० टक्के करण्यात आल्याने सोने महागणार

>
काजू महाग झाले

>
पुस्तके – पदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरील कर वाढवल्याने किंमत वाढणार

>
पिव्हीसी पाईप महागणार

>
गाड्यांचे सुटे भाग महाग होणार

>
सिंथेटीक रबर महागणार

>
ऑप्टीकल फायबर

>
घरांच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या टाइल्सच्या किंमती वाढणार

>
फ्लोअरिंग म्हणजेच व्हिनएल फ्लोअरिंग महागणार

स्वस्त होणार

>
इलेक्ट्रीक कार: विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात येणार असल्याने इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार

>
विमा स्वस्त होणार

>
घरे स्वस्त होणार: भाड्याने घरे घेण्यासंदर्भातील कायद्यामध्ये बदल करणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 2:03 pm

Web Title: budget 2019 what gets cheaper and what gets costlier complete list scsg 91
Next Stories
1 Budget 2019: लवकरच २० रुपयाचे नाणेही चलनात येणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा
2 Budget 2019: भारतीय अर्थसंकल्पाबद्दल या १२ रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
3 Budget 2019: जाणून घ्या भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास
Just Now!
X