News Flash

अर्थसंकल्पाचा भाजपला निवडणुकांत कितपत फायदा..?

पाच राज्यांमध्ये नवचेतना मिळण्याची शक्यता कमीच

पाच राज्यांमध्ये नवचेतना मिळण्याची शक्यता कमीच

पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या अर्थसंकल्पाने भाजपला कितपत फायदा होईल, याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. अर्थसंकल्पातील ‘भव्य दिव्य’ घोषणांच्या मदतीने वातावरण एकदमच पालटून टाकण्याची शक्यता बहुतेकांना निराधार वाटत आहे.

‘प्राप्तिकर निम्म्याने कमी केला आणि अन्य कर वाढविले नाहीत.. यापेक्षा अर्थसंकल्पात ‘लोकप्रिय’ असे काही नाही. त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होण्याची शक्यता वाटत नाही,’ अशी कबुली खुद्द भाजपच्या एका नेत्याने अनौपचारिक गप्पांमध्ये दिली.

पंजाब व गोव्यामधील निवडणुकींच्या तीन दिवस अगोदर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यासारखी ‘भव्य दिव्य’ घोषणा करून भाजप स्वत:चा फायदा करून घेण्याची भीती विरोधकांना वाटत होती. त्यामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची मागणी वारंवार केली जात होती. पण जेटलींच्या पोतडीतून बाहेर पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये ‘फील गुड’ असे काही नसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. प्राप्तिकरात कमी केल्याचा ढोल भाजपकडून बडविला जाण्याची भीती काही विरोधी नेत्यांनी बोलून दाखविली. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‘जनतेला खूश करण्यासाठी प्राप्तिकर कमी केलाय आणि निवडणुका पाहून नवे कर लावले नाहीत.’

दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, रोजगारनिर्मितीकडे लक्ष दिलेले नाही आणि महिलांसाठी विशेष असे काही नसल्यासारखे मुद्दे विरोधकांना मिळतील.

प्रभाव पाडू शकणाऱ्या काही घोषणा..

  • नवा कर नाही किंवा अस्तित्वातील करांमध्ये लक्षणीय वाढ नाही.
  • मनरेगासाठी ४८ हजार कोटींची म्हणजे
  • आतापर्यंतची सर्वाधिक विक्रमी तरतूद
  • मागील वर्षांच्या तरतुदीत थेट ३५ टक्क्यांची वाढ करून दलितांसाठी ५२,३९३ कोटी रुपये
  • कृषी पतपुरवठा दहा लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्णय

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 1:46 am

Web Title: budget benefit to bjp in election
Next Stories
1 घाव ‘अज्ञात’ राजकीय देणग्यांवर..
2 कानपूरमध्ये इमारत कोसळली; ७ जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
3 इस्तंबूलमध्ये रुग्णालयातच पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X