संसदेचे आज, सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. पहिलाच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोदी सरकारला तीव्र विरोधाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक झाली. विरोधी पक्षांच्या सर्व मुद्दय़ांची दखल घेतली जाईल असे आश्वासन मोदी यांनी या बैठकीत दिले.