उत्तर दिल्लीत शनिवारी इंद्रलोक भागात चार मजली इमारत कोसळून दहा जण ठार झाले. एकूण १२ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात होत़े  त्यापैकी सहा जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल़े परंतु,  चौघांचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत, असे बारा हिंदू राव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.बी.मित्तल यांनी सांगितले.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले, की सकाळी नऊ वाजता इंद्रलोक भागातील तुलसीनगर येथे इमारत कोसळल्याचा फोन आला होता. तेथे तातडीने चार अग्निशमन बंब पाठवून मदतकार्य सुरू करण्यात आले. गर्दीच्या वस्तीत ही घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. शेजारी बांधकाम चालू असल्याने हादरे बसूनन ही आधीच मोडकळीला आलेली इमारत कोसळली. ही इमारत तब्बल पन्नास वर्षांपूर्वीची होती.
तेथे अनेक कुटुंबे राहात होती, असे पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी सांगितले.