19 September 2020

News Flash

घरात शौचालय बांधा आणि रजनीकांतच्या ‘कबाली’चे तिकीट मोफत मिळवा!

या कल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे

'स्वच्छ भारत' अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, यासाठी पुदुच्चेरीचे जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

सुपरस्टार अभिनेता रजनीकांतच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी आता पुदुच्चेरीचे जिल्हा प्रशासन पुढे सरसावले असून, त्यांनी एक नामी शक्कल लढवलीये. अधिकाधिक नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा, यासाठी घरात शौचालय बांधणाऱ्यांना त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांचा वापर करणाऱ्यांना रजनीकांत याच्या आगामी ‘कबाली’ चित्रपटाचे तिकीट मोफत देण्यात येईल, असे आश्वासन पुदुच्चेरीच्या जिल्हा प्रशासनाने दिले आहे. विशेष म्हणजे या कल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
वाचा : कबालीच्या प्रमोशनचा हटके फंडा
‘स्वच्छ भारत’ अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, यासाठी पुदुच्चेरीचे प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी उघड्यावर शौचाला जाण्याऐवजी प्रत्येकाने आपल्या घरात शौचालय बांधावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळावा म्हणून आता रजनीकांतच्या प्रसिद्धीचा वापर करून घेण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यात रजनीकांत याचे लाखो चाहते आहेत. त्याच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. यामुळे त्याच्या ‘कबाली’ चित्रपटाची तिकीट मिळवण्यासाठी लोक घरात शौचालय बांधण्यासही आणि सार्वजनिक शौचालयांच वापर करण्यास तयार झाली आहेत. आमच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पुदुच्चेरीच्या जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
वाचा : रजनीकांत यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही – राधिका आपटे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 7:20 pm

Web Title: built a toilet in house get rajinikanths kabali ticket free
Next Stories
1 मित्रांच्या व्यसनाला कंटाळून त्याने लढवली तारणहार शक्कल!
2 पाहा कशी होती जगातील पहिली जाहिरात
3 Taiwan: तैवानने चीनच्या दिशेने चुकून डागले मिसाईल!
Just Now!
X